Gold Rates: सोने झाले स्वस्त झाले; चांदीचे भावही घसरले, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। Gold Silver Price on 26 October 2024: दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून 1,450 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावातही घसरण दिसून आली आहे.

3000 रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या खाली आला आहे. प्रॉफिट बुकींग आणि परदेशातील कमकुवत मागणीमुळे सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या घसरलेल्या मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 80,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर गुरुवारी भाव 81,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

दुसरीकडे, चांदीही विक्रीच्या दबावाखाली राहिली आणि 2,000 रुपयांनी घसरून 1 लाख रुपयांच्या खाली 99,000 रुपये प्रति किलोवर आली. याआधी गुरुवारी चांदीचा भाव 1.01 लाख रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

गेल्या दोन दिवसांत चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण दिसून आली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक बाजारपेठेतील ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांची कमकुवत मागणी आणि परदेशातील बाजारातील कमजोर कल यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *