Income Tax: देशातील करदात्यांना मिळणार मोठा दिलासा ; 8 लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। साल २०२४ मध्ये यावर्षी अंदाजे ७.३ कोटी लोकांनी ITR फाईल केला असून मीडिया रिपोर्टमध्ये सरकार ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स रिटर्नवर सवलत देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. सध्या देशात सात लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त तर ५० हजार रुपयांची अतिरिक्त वाजवटीचा लाभ दिला जात आहे. अशा परिस्थितीत करमुक्त आयकर रिटर्न आठ लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते.

अशा परिस्थितीत मोदी सरकारने कर्मर्यादा वाढवून ८ लाख रुपये केली तर प्राप्तिकर परताव्याच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. यावर्षी सुमारे दोन कोटी अधिक आयटीआर दाखल केले जातील अशी अपेक्षा आहे. देशातील लाखो सामान्य करदात्यांना सूट देण्याची मागणी जोर धरू लागली असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

आयटीआर फायलिंगचे रेकॉर्ड मोडणार
गेल्या वर्षी अर्थसंकल्पात दिलासा दिल्यापासून आतापर्यंत आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) आर्थिक विभागाच्या संशोधन अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांना सूट दिल्याने रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. अशा स्थितीत, सरकारने मोठे पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून आयटीआर फायलिंगची संख्या वाढेल. त्याचवेळी, यावर्षी आयटीआर फायलिंगमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात असेही अहवालात नमूद करण्यात आले आहेत. या आर्थिक वर्षात जवळपास दोन कोटी अधिक ITR दाखल होण्याची अपेक्षा असून असे झाल्यास आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयटीआरची संख्या नऊ कोटींच्या पुढे तर येत्या आर्थिक वर्षात आकडा सहज दहा कोटींच्या पुढे जाऊ शकतो.

यासोबतच एसबीआयच्या अहवालात वर्षानुवर्षे आयटीआर रिटर्नमध्ये वाढ होत असल्याचेही म्हटले आहे. २०२२ मध्ये एकूण ७.३ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते तर २०२४ मध्ये हा आकडा वाढून ८.६ कोटीपर्यंत वाढू शकतो मात्र, या अहवालात मोठा खुलासा झाला आहे. आता नियोजित तारखेनंतर आयटीआर भरणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे अहवालातून समोर आले असून यामुळे लोकांमध्ये शिस्त दिसून येत आहे मात्र, प्राप्तिकर विभागाने आयटीआर प्रक्रिया सुलभ करणेही यामागचे एक कारण हेही असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *