महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। चिंचवडगाव येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रस्तुत ‘मोहिनी’ या एक्सक्लुजिव्ह सोने व हिऱ्यांमध्ये स्पेशल कुंदन, अँटिक, पोलकी व हेरीटेज दागिन्यांचे अद्वितीय कलेक्शन असणाऱ्या खास ब्रायडल ज्वेलरी असलेल्या दालनाचे उदघाटन सोमवार दि. 28 ऑकटोबर रोजी स. 10 वा होणार आहे. या दालनाचे उदघाटन दिलीप सोनिगरा यांच्या मातोश्री ‘श्रीमती मोहिनीबेन पनराजजी सोनिगरा’ यांच्या हस्ते होणार आहे.
हा उदघाटन सोहळा दि. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 24 या कालावधीसाठी आयोजीत केला आहे. नववधूसाठी स्पेशल ब्रायडल दागिने सेट्स तसेच कुंदन, अँटिक,पोलकी व हेरीटेज दागिन्यांचे कलेक्शन असणारे पिपंरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील हे एकमेव स्वतंत्र दालन आहे.
उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 24 या काळात ‘मोहिनी’ मध्ये सोने दागिन्यांच्या घडणावळीवर २५% व हिरे आणि पोलकी दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% अशी भरघोस सूट मिळणार आहे. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे गेली 1969 पासून ज्वेलरीच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहेत. चिंचवडगांव, हिंजवडी, कामशेत, चाकण, रहाटणी, तळेगांव दाभाडे, या ठिकाणी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शाखा कार्यरत असून असंख्य व विविध दागिन्यांचे कलेक्शन असणारे दालन म्हणून हे सर्वदूर परिचित आहे.
आई मोहिनीबेन आणि वडील पनराजजी आणि मोरया गोसावींच्या आशीर्वादाने सुरु होत असलेल्या मोहिनी दालनाच्या उदघाटन प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित रहावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक दिलीप सोनिगरा यांनी केले आहे.