Railway Rule: रेल्वे सुटल्यानंतर त्याच तिकीटवर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। भारतीय रेल्वेने अनेक लोक प्रवास करतात. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर अनेकजण रेल्वेचा पर्याय निवडत असतात. कारण रेल्वेचा प्रवास स्वस्त असतो, त्यामुळे प्रत्येकजण रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडत असतो. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमची रेल्वे कधी सुटली आहे का ?

हो, तर रेल्वे सुटल्यानंतर तुम्ही त्याच तिकीटाने दुसऱ्या रेल्वेने प्रवास करू शकतात का? परंतु हे फक्त जनरल तिकीटाने प्रवास करतात, त्यांच्याचसाठी आहे. पण आरक्षण तिकीट घेणारे लोक हे करू शकत नाहीत. त्यामुळे हा नियम काय आहे हे जाणून घेऊया.

जर कोणत्या कारणआने तुमची रेल्वे सुटली असेल तर आणि तुमच्याकडे जनरल तिकीट असेल तर तुम्ही दुसऱ्या ट्रेनने सहज प्रवास करू शकतात. परंतु हे रिझर्व्हवेशन म्हणजेच आरक्षित तिकीट बूक केलेल्या लोकांना असा प्रवास करता येणार नाही. कारण त्यांनी एका जागेसाठी, एका विशिष्ट वेळेसाठी तिकीट घेतलं असतं. त्यामुळे दुसऱ्या ट्रेनने तुम्ही प्रवास करू शकत नाहीत. या दोन्ही कॅटेगरीसाठी नियम वेगवेगळे आहेत. आता प्रश्न आहे की, अशा स्थितीत तुम्ही काय करू शकतात.

जर तुमच्याकडे रिझर्व्हेवेशन तिकीट असेल आणि तुमची रेल्वे सुटली असेल तर तुम्ही कोणत्याही रेल्वेत बसून प्रवास करू शकत नाहीत. पण एक मार्ग आहे, यात तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही तिकीट काउंटरवरून तुमचे आरक्षण घेतले असेल, तर तुम्हाला तिथे जाऊन टीडीआर फॉर्म भरावा लागेल. जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले असेल तर तुम्ही आयआरसीटीसी साइट आणि ॲपद्वारे टीडीआर फॉर्म भरू शकता.

तसेच हे केवळ एकाच प्रकरणात होऊ शकते, जर आपण काही कारणास्तव प्रवास करण्यास सक्षम नसाल. तुम्हाला चार्ट तयार करण्याच्या एक तास आधी TDR दाखल करावा लागेल. TDR दाखल केल्यानंतर तुम्हाला ६० दिवसांच्या आत पैसे परत मिळतील. ही सुविधा तात्काळ तिकिटांसाठी नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *