महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – ता. १ ऑगस्ट – नांदेड जिल्यातील धर्माबाद नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांची काही दिवसा पूर्वी बदली करण्यात आली असुन त्यांच्या जागी कायम स्वरूपी मुख्यधीकारी न देता प्रशासनाने एका बड्या नेत्याणे आपले वजन खर्ची केल्या मुळे श्री.मंगेश देवरे यांची श्रीगोद्याला बदली करण्यात आली असल्याचे जनसामान्यात बोलले जाते आहे. हे पद गेली कित्येक दिवसा पासून रिक्त आहे.यांचा अतिरिक्त पदभार धर्माबाद पासून 40 किलोमीटर दूर असलेल्या उमरी येथील काकासाहेब डोईफोडे यांच्या कडे दिला आहे.
जे की सद्या कोरोना व्हायरस चा या दोन्ही तालुक्यात फार मोठया प्रमाणात शिरकाव झाला आहे. धर्माबाद तालुक्यात तर अक्षरशः कोरोनाचा अणुबाँब पडल्या सारखी स्तिथी झालीआहे.धर्माबाद शहरापासुन काही अंतरावर असणाऱ्या अल्कोहोल निमिर्ती करणाऱ्या शासनास महिन्याला 40 कोटी चे महसूल मिळून देणाऱ्या कंपनीतच लॉकडाऊन असतानाही एका कर्मचाऱ्याणे हेंद्राबाद येथून ये जा करीत असताना तो तपासणीत पॅझिटिव्ह आढळला त्यामुळे या कंपनीतील आज पर्यंत 20 कर्मचारी संक्रमित झाले आहेत. या कंपनीत एकूण 400 कर्मचारी कामाला आहेत. पण कंपनीतील वेस्टेज जसे की भंगार. भुसा. राख. लिक्विड अल्कोहोल ने आण करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या कंपनीत काम कारणारे अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध भागात वास्तव्य करून असल्यामुळे भविष्यात धर्माबाद शहराची धारावी होण्यास विलंब लागणार नाही. असूनही बऱ्याच लोकांचे अहवाल येणे बाकी असून काही लोकांची तपासणी करावयाची बाकी आहे.
शहरातील एका पाणी फिल्टर चे व्येवसाहिक असलेल्या व्यक्तीला ही याचं कर्मचारी कडून बाधा झाल्याचे त्याच्या हिस्ट्रीत तशी नोंद आहे. तो व्यापारी या कंपनीचा गुतेदार असून तो इथेच संक्रमित झाला असावा असा अंदाज आहे. मुख्यधिकारी यांची बदली झाल्या पासून शहराचा विकास खुंटला आहे. तरी पण या कोरोना व्हायरस च्या काळात शहराची साफ सफाई. पावसाळ्यातील कामे. शहरातील विकास कामना खीळ बसली असून या रोगापासून शहराची सुरक्षा करण्यासाठी शासनाने महसूल.आरोग्य. पोलीस. व नगरपालिका किव्हा ग्रामपंचायत यांची जोड लावून दिली आहे. पण येथील नगर परिषदेला कायम स्वरूपी मुख्याधीकारी नसल्यामुळे शहराची एक बाजू अपंग झाली आहे. धर्माबाद शहरास एक कर्तव्य दक्ष अधिकारीची अत्तेंत गरज असल्याची बाब पालकमंत्री मा.ना. अशोकराव चव्हाण यांना निदर्शनास आणून देऊन धर्माबाद नगर पालिकेस कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळून देण्याची मागणी एका निवेदना मार्फत सौ. नीता संजीवकुमार गायकवाड यांनी केली आहे.