महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। तळेगाव दाभाडे ।। गेल्या पाच वर्षांत जनतेत राहून जनतेसाठी काम केल्यामुळे आमदार शेळके यांना मावळच्या सर्वसामान्य जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधक चांगलेच धास्तावले आहेत. सरळ लढतीत देखील त्यांना पराभूत करणे अशक्य असल्याने विरोधकांनी ‘रडीचा डाव’ खेळण्यास सुरूवात केली आहे. कारस्थानी खलबते करून शेळके यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक मुद्द्यांवर बाद ठरविण्यासाठी विरोधकांनी केलेला आटापिटा निष्फळ ठरवत आमदार शेळके यांनी विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी टाकले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेळके यांचा उमेदवार अर्ज वैध ठरविल्यामुळे विरोधकांची घोर निराशा झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक विभागाकडून करण्यात येणाऱ्या अर्ज छाननी प्रक्रियेत तो अर्ज वैध ठरणे अतिशय महत्वाचे असते आणि उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्यास तो उमेदवार निवडणुकीपूर्वीच रिंगणातून बाहेर होतो. यामुळे आमदार शेळके यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी विरोधकांनी चालविलेला आटापिटा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे.
आमदार सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने वडगाव येथे जमा झाले होते. अर्ज भरून झाल्यानंतरही आमदार शेळके काय बोलणार याची आतुरता या नागरिकांना होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक हा सुनील शेळके यांचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिला होता. त्या ठिकाणी आलेल्या महिला, तरुण-तरुणी या सर्वांचा जल्लोष हा एखाद्या विजयोत्सवाप्रमाणे होता.
आमदार सुनील शेळके यांच्यासाठी जनतेने केलेल्या शक्तीप्रदर्शनाला उत्तर देण्यासाठी विरोधकांनी देखील तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकांना आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरवणुकी पुरते आलेली ही माणसं उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे भाषण ऐकण्यासाठी देखील थांबली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी सुनील शेळके यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचा कांगावा करीत त्यावर हरकत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाने सर्व हरकती फेटाळून लावत आमदार शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला व त्यांच्या नावाला व निवडणूक चिन्हाला मतदान यंत्रावर क्रमांक एकचे स्थान दिले.
विरोधकांच्या सगळ्या खेळी अपयशी ठरवू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. निवडणुकीला अजून २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी त्यातील 18 दिवस बाकी आहेत, मात्र आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काही तरी कुरघोडी करायची व त्यांना बदनाम करायचे षड्यंत्र हे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे.
विरोधकांनी कितीही कट-कारस्थाने केली, आटापिटा केला तरी मतदार राजा सुज्ञ आहे. आमदार सुनील शेळके यांनी पाच वर्षात या मावळ तालुक्यातील जनतेसाठी काय विकास कामे केली आहेत, पुढील पाच वर्षे त्यांचे काय व्हिजन आहे या सर्व गोष्टी मतदार राजाला माहित असल्यामुळे मावळ तालुक्यातील प्रत्येक मतदार हा आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या संवाद मेळाव्यांना होत असलेली गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता विरोधकांकडून मतदाराला धाक दडपशाही दाखवत दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हा मतदार उद्याच्या काळामध्ये आपल्या मतदानाधिकाराचा वापर करत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल, यात कोणतीच शंका नाही.