महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने योजना राबवलल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे सुभद्रा योजना. सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत केली जाते.
सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये दिले जातात. ओडिशा सरकारने ही योजना राबवली आहे. ओडिशा सरकारने महिलांना वर्षाला १०,००० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी राबवण्यात आली आहे. (Odisha Government Scheme)
ओडिशा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेला सुरुवात तेली. या योजनेत लाभ घेणारी महिला ही ओडिशा राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेकडे ओडिशा राज्याचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.तसेच महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असायला हवे.याच महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Subhadra Yojana For Women)
सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून दोनवेळा पैसे मिळणार आहेत.या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने https://subhadra.odisha.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.