Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत सुधारणा : समर्थकांना दिलासा देणारा पहिला फोटो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. त्यांना पुढील २४ तास वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, असे पक्षाकडून ‘एक्स’वर पोस्ट करुन सांगण्यात आले होते. त्यानंतर आता वंचितचे कार्यकर्ते आणि प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांना दिलासा देणारा ‘बाळासाहेबां’चा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


पहिला फोटो समोर
कोरा चहा (ब्लॅक टी), मारी बिस्किटे आणि वर्तमानपत्रे — बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशी केली. बाळासाहेबांना आज रुग्णालयातील आयसीयूमधून दुसऱ्या विभागात हलवण्यात येणार आहे. आम्ही लवकरच बाळासाहेबांचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करणार आहोत, असे एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अँजिओप्लास्टी यशस्वी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी (३१ ऑक्टोबर) पहाटे पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली.

‘प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, हितचिंतक आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि संदेशांसाठी आंबेडकर कुटुंब आभार मानत आहे,’ असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *