अखेर चिंचवडमध्ये तिरंगी लढत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24: ऑनलाईन: विशेष प्रतिनिधी : संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आता खरी लढत ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात होणार आहे. गेल्या एका महिन्यापासून निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या बरोबरीने भाऊसाहेब भोईर यांनी संपूर्ण चिंचवड मतदार संघ पिंजून काढला असून आतापर्यंत त्यांनी चिंचवड मतदार संघातील एक लाख पेक्षा अधिक लोकांना त्यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे सध्या भोईर यांचे पारडे जड झाले असून त्यांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी अर्ज भरला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाना काटेंची भेट घेऊन समजूत घातल्यामुळे नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता होती. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर काटे यांनी अखेर त्यांचा उमेदवारी आज माघारी घेतली आहे.

भाऊसाहेब भोईर हे पाच वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. २००९ ला विधानसभा आणि २०१४ ला लोकसभा निवडणूक लढलेल्या भाऊसाहेब भोईर यांच्याकडे निवडणुकीचा दांडगा अनुभव असून उच्चभ्रू तसेच तळागाळापर्यंत भाऊसाहेब भोईर यांचा थेट संपर्क असल्याने त्यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यात मात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *