महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – ता. २ ऑगस्ट – एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणतेही अद्याप शाश्वती नाही. सध्या जर आपण कोरोनाचा संसर्ग पाहिला तर शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे, तर दुसरीकडे ऑगस्ट महिना उजाडला असताना अर्ध शैक्षणिक वर्ष असाच वाया जात असेल तर हे शैक्षणिक वर्षे गाळून (ड्रॉप) करून नवं शैक्षणिक वर्ष आपण सुरू केलं तर? याचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो असं मुख्यमंत्री ठाकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.