महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र अद्यापही सुरू आहे. सलमानला पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी थेट सलमानला कॉल न करता मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. या धमकीत देखील लारेन्स बिष्णोईचं नाव समोर आलं आहे.
सलमानला कॉल न करता मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. या धमकीत देखील लारेन्स बिष्णोईचं नाव समोर आलं आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीवजा मेसेज मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये मी लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा त्याने केला आहे.
धमकीत नेमकं काय म्हटलंय?
सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी. नाहीतर ५ कोटी रुपये द्यावे लागतील न दिल्यास जिवे मारू. आमची गँग आजही अॅक्टीव्ह आहे. असा मेसेज वाहतूक नियंत्रण कक्षाला काल मध्यरात्री आला आहे.
सलमान खान सध्या बिग बॉसचा १८ वा सिजन होस्ट करत आहे. १४ एप्रिल रोजी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर देखील गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी देशभरातून काही आरोपींना ताब्यात घेतलं आणि या प्रकरणी चौकशी सुरू आहे. यानंतर आतापर्यंत सलमानसह त्याचे वडील आणि झिशान सिद्धिकी यांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सलमानच्या जीवाला धोका?
सलमान खान बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आजवर या सिनेविश्वाला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. फक्त देशात नाही तर देशाबाहेर देखील त्याचे चाहते आहेत. अशात सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.