या बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! नोव्हेंबर महिन्यात UPI सर्व्हिस २ दिवस बंद राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। आजकाल बँकेचे सर्व काम ऑनलाइन होते. सध्या सगळीकडे डिजिटल पेमेंटचा वापर केला जातो. डिजिटल पेमेंटमुळे सर्व कामे सोपी झाली आहेत. यूपीआयमुळे सर्वांनाच फायदा झाला आहे. विविध बँकांचे यूपीआय सर्व्हिस आहेत. दरम्यान, एचडीएफसी बँकेची यूपीआय सिस्टीम या महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे.

एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस अस्थायी पद्धतीने बंद राहणार आहे. बँकेच्या मेंटेनेंसच्या कामासाठी यूपीआय सर्व्हिस बंद राहणार आहे.याबाबत बँकेने ग्राहकांना माहिती दिली आहे. (HDFC Bank UPI)

एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस ५ नोव्हेंबर म्हणजेच आज रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाउंट तसेच रुपये क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व यूपीआय व्यव्हार बंद राहणार आहे. याचा परिणाम एचडीएफसी मोबाइल बँकिंग अॅप, गुगल पे, व्हॉट्सअॅप पे, पेटीएम, श्रीराम फायनान्स, क्रेडिट पे या प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

UPI वर स्मार्टफोन-बेस्ड फंड ट्रान्सफर प्रोसेस आहे. ज्यामुळे युजर्सला यूनिक UPI ID चा वापर करुन पैसे पाठवायची आणि घ्यायची सर्व्हिस देतात. (HDFC Bank UPI Payment Will Close)

UPI ट्रान्झॅक्शन फेल झाले तर काय होणार?
जर तुम्ही चुकीचा यूपीआय पीन टाकला तर किंवा खात्यात पैसे कमी असेल तर तुमचे ट्रान्झॅक्श फेल होऊ शकते. त्यामुळे ट्रान्झॅक्शन करण्याआधी सर्वात आधी बॅलेंस चेक करा.

UPI कोण-कोण वापरु शकते?
जर कोणत्या व्यक्तीकडे अॅक्टिव्ह बँक अकाउंट, मोबाईल नंबर आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर ती व्यक्ती यूपीआय वापरु शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *