Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 चे अनावरण ; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईक ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत, परंतु आता कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये स्प्लॅश करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. Royal Enfield च्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता शेवटी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 चे अनावरण EICMA 2024 मध्ये इटलीच्या मिलानमध्ये करण्यात आले आहे.

या बाईकचे कोडनेम Electrik01 आहे, कंपनीने ही मोटरसायकल नवीन L प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर कंपनीच्या सर्व आगामी इलेक्ट्रिक बाइक्स या प्लॅटफॉर्मवर बनवल्या जाऊ शकतात. डिझाईनबद्दल बोलायचे झाले, तर या बाइकमध्ये गोल हेडलॅम्प्स, लाँग फेंडर्स आणि गर्डर फ्रंट फोर्क्स आहेत. अलॉय व्हील, गोल मिरर आणि पातळ टायर असलेली ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल सीटर पर्यायासह फोटोमध्ये दिसते.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, एलईडी लाइटिंग आणि एलईडी टर्न सिग्नल, पूर्णपणे डिजिटल टीएफटी वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोल या बाइकमध्ये दृश्यमान आहेत. याशिवाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सपोर्ट सारखे फीचर्स देखील या बाईकमध्ये उपलब्ध असतील, मात्र सर्व फीचर्स अजून समोर आलेले नाहीत. या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि रायडिंग मोड यासारखे खास फिचर्स देखील दिले जातील अशी अपेक्षा आहे. सध्या Royal Enfield ने या बाईकचे फीचर्स, बॅटरी आणि मोटरशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

रॉयल एनफिल्डची ही बाईक भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी कधी लॉन्च होईल किंवा भारतात या बाईकची किंमत काय असेल? सध्या याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, कारण ही बाईक अद्याप भारतीय रस्त्यांवर दिसली नाही किंवा कंपनीने इव्हेंट दरम्यान याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *