रेशन दुकानदारांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : ऑनलाईन: पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) पिंपरी विधानसभा मतदारसंघातील रेशन दुकानदारांनी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला. दुकानदारांच्या अडचणीच्या काळात आमदार अण्णा बनसोडे कायम सोबत राहिले आहेत. त्यामुळे आम्ही जाहीरपणे अण्णा बनसोडे यांना पाठिंबा देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

यावेळी विजय गुप्ता, कपिल चौधरी, लजपत मित्तल, नरेश अगरवाल, अजय जाधव, एस एन कांबळे, अलका जगताप, रेखा गायकवाड, राजू कर्णावट, विष्णू चंचलानी, व्ही एन मिसळ, गणेश कांबळे, हरेश मुलाणी, जय उणेचा, प्रशांत नानेकर, शकील सुदुस, श्रीमती कापसे, चंद्रकांत वाघेरे, महेश शिंदे, अनिल वाघेरे, श्री माऊली आदी उपस्थित होते.

रेशन दुकानदारांना येणाऱ्या अडचणींमध्ये दुकानदार हक्काने आमदार अण्णा बनसोडे यांना हाक मारतात. अण्णा बनसोडे देखील कायम आम्हाला मदत करत आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही अण्णा बनसोडे यांचे काम करणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले. अण्णा तुम्ही निवडून येणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, शहरातील बहुतांश रेशन दुकानदारांसोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. दुकानदार आणि ग्राहक या दोघांच्या व्यथा मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य पुरवण्याचे रेशन दुकानदार काम करतात. त्यामुळे ते समाजाचा प्रमुख घटक आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *