Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट मुदत वाढली ; पहा शेवटची तारीख कधी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ नोव्हेंबर ।। भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे का होत आहे. तुम्हाला कॉलेजपासून ते अगदी मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्ड हे अपडेट करायचे असते. आता ऑनलाइन मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

गेल्या १० वर्षात जर तुम्ही तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव, जन्मतारीख अपडेट केली नसेल तरआता करा. युनिक आयडेटिफिकेशन ऑफ इंडियानं यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. आता तुम्ही १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. (Aadhaar Card Free Update)

यूआयडीएआच्या (UIDAI) माहितीनुसार, जर तुम्ही गेल्या १० वर्षात आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते अपडेट करावे. तुम्हाला दहा वर्षातून एकदा आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ होती. ही तारीख वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करावे. अन्यथा तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. (Aadhaar Card Update)

आधार कार्डवर तुमचा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. हा नंबर सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.

आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर

Update Aadhar Card वर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुम्ही माहिती भरुन कागदपत्रे अपडेटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो टाका.

ओटीपीनंतर लॉग इन करा. जी माहिती अपडेट करायची आहे ती निवड आणि योग्य माहिती भरा.

यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा आणि सबमिट करा.

यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल. त्यावर तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *