महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ नोव्हेंबर ।। शरद पवारांनी अजित पवारांबाबत बारामतीमध्ये मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. थेट बारामतीच्या मैदानात युगेंद्र पवारांसाठी सभा घेताना अजित पवारांचं शरद पवारांनी कौतुक केलंय. मात्र या कौतुकाचा अर्थ काय आणि यानिंमित्तानं पवारांनी बारामतीकरांना नेमकी काय साद घातलीय ते पाहूयात.
ऐन लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली.अजित पवार महायुतीत आले तेव्हापासून पवार कुटुंबात एकमेकांविरोधात टीका,टोमणे अन् खोचक सल्ल्यांचा सिलसिला सुरुच होता.मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजित पवारांच्या कामाबाबत स्तुतीसुमने उधळलीयेत.त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. एवढेच नाही तर काय म्हणालेत शरद पवार (sharad pawar) पाहूयात.
पवारांनी अजितदादांचं कौतुक केलं असलं तरी त्यांनी बारामतीत पुढच्या तीस वर्षांसाठी नेतृत्त्व तयार करायचं असल्याचा निर्धारही व्यक्त केलाय. म्हणजे पवारांनी अजित दादांच्या भूतकाळातल्या कामांचं कौतुक केलं असलं तरी भविष्यात मात्र नव्या नेतृत्त्वाला संधी देण्याची साद घातलीय.
त्यामुळे भूतकाळातल्या कौतुकामागे भविष्यातल्या परिवर्तनाची हाक पवारांनी बारामतीकरांना दिलीय. त्यामुळे बारामतीकर वर्तमानातल्या नेतृत्त्वावरच विश्वास दाखवणार की पुढच्या दीर्घकालीन नवनेतृत्वासाठी याच निवडणुकीत परिवर्तन घडवणार याबाबत आता उत्सुकता लागलीय.