भोसरी मतदारसंघात ” डिजिटल लक्ष्मी दर्शन”- डॉ अमोल कोल्हे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ नोव्हेंबर ।। लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘डिजिटल लक्ष्मी दर्शन’ सुरू असून याच्या विरोधात आता आपला आवाज एकजुटीने वाढवला पाहिजे असे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) काँग्रेस तसेच इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ यमुना नगर निगडी येथे (दि .6)मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे बोलत होते. मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे माजी, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका भिमाबाई फुगे तसेच केसरीनाथ पाटील, मनीषा गरुड, इमरान शेख आदीं उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी गंभीर आरोप केले ते म्हणाले लोकसभेमध्ये बँकांच्या शाखा रात्री रात्री उघड्या होत्या. त्यातून कसे लक्ष्मी दर्शन झाले हे आपण पाहिले. भोसरी मतदारसंघांमध्ये तर वेगळे चित्र आहे.
“बाई मला आमदारकीची हौस आणि ‘जी-पे’ चा पडतोय वेगळाच पाऊस असे म्हणत त्यांनी गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा यानंतर आता ‘डिजिटल लक्ष्मीदर्शन’ सुरू आहे. याकडे कार्यकर्त्यांनी लक्षपूर्वक पाहिले पाहिजे . कार्यकर्त्यांनी एकजुटीने आपला आवाज आता वाढवला पाहिजे.

त्यागाची भूमिका काय शिवसैनिकांनी दाखवून दिले – सचिन अहिर

महाविकास आघाडी टिकली पाहिजे, यातून आपण जो संघर्ष उभा केला आहे. तो आपल्याला एका निश्चित ध्येयापर्यंत न्यायचा आहे . त्यागाची भूमिका काय असते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. उध्दवसाहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचल्याची वेदना शिवसैनिकांमध्ये आजही कायम आहे. कार्यकर्त्यांना, पदाधिका-यांना काेणत्याही पदाची, महामंडळाची अपेक्ष नाही, काेणतीही आँफर नकाे, विधानसभा, विधानपरिषद नकाे, शिवसैनिकांच्या त्यागाच्या विश्वासावर हा पक्ष जगविण्याचे काम पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला एक जागा मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका हाेती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यासाठी सातत्याने आग्रही हाेते. मात्र, आघाडी टिकली पाहिजे, आघाडी मजबूतीने पुढे जायला पाहिजे, त्यामुळे कमी जागा मिळाल्यानंतरही आम्ही आघाडीची भूमिका घेऊन पुढे जात आहाेत. यात या मतदारसंघातील सुलभा उबाळे, रवी लांडगे यांच्यासह तमाम शिवसैनिकांची भूमिका महत्त्वाची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *