महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 0७ नोव्हेंबर ।। विरोधकांकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ते केवळ टीका करत आहेत. पक्षाच्या गुड बुक मध्ये राहण्यासाठी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून टीका केली जात आहे. पण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. जनता विरोधकांचा ढोंगीपणा खपवून घेणार नाही. असे सडेतोड उत्तर महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.
पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर टीका केली. आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेली पाच कामे दाखवावी अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर आमदार अण्णा बनसोडे यांनी पलटवार केला आहे. तुम्ही पाच कामे मागितली. मी 25 कामे सांगतो, असे म्हणत आमदार बनसोडे यांनी क्रीडा, शैक्षणिक, कामगार, महिला, आरोग्य, अध्यात्म, धार्मिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात केलेली कामे सांगितली.
ही घ्या केलेल्या कामाची यादी
आंध्रा आसखेड पाईपलाईन योजना राबवली
दापोडी येथे पाण्याची टाकी उभारली
सर्व धर्माच्या स्मशानभूमी मधील विकास कामे केली
पिंपरी मिलिंदनगर येथे शादीखानाचे काम केले
अनेक गृहनिर्माण संस्थांच्या आवारात पेविंग ब्लॉक बसविले
महावितरण मार्फत उच्च व लघुदाब वाहिकेचे भूमिगत काम तसेच नवीन रोहित्रांची उभारणी केली
अमृत योजनेअंतर्गत निगडी ते दापोडी दरम्यान 1000 इंच व्यासाची नवीन पाईपलाईन केली
घरकुल योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घराचे वाटप केले
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडीधारकांना पक्के व स्वतःचे हक्काचे घर दिले
शाहूनगर, संभाजीनगर येथील सोसायटी यांना .5 एफएसआय मंजुरी व वाढीव बाल्कनीसाठी दंड कमी करून घेतला
आकुर्डी निगडी प्राधिकरण येथील भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतला
खंडोबा मंदिर आकुर्डी येथे सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण केले
चिंचवड येथे सायन्स पार्क व तारांगणची उभारणी केली
दापोडी येथे आई उद्यानाची उभारणी केली
प्राधिकरण येथे अद्यावत ग दि माडगूळकर नाट्यगृहाची उभारणी केली
बर्ड व्हॅली येथे वडार समाज मजूर शिल्पाची उभारणी केली
पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, अद्ययावत ग्रंथालय व सांस्कृतिक भवन तयार केले
लघु व मध्यम उद्योजकांना संशोधन, विकास व प्रदर्शनासाठी ऑटो कलस्टरची स्थापना केली
ऑटो क्लस्टर ते काळेवाडी येथील पवना नदी, लोहमार्ग व राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारा मदर तेरेसा उड्डाणपूल पूर्णत्वास नेला
भक्ती शक्ती येथे उड्डाणपुलाची बांधणी केली
नाशिक फाटा येथे महाराष्ट्रातील पहिला दुमजली उड्डाणपूल तयार केला
केएसबी चौक येथे उड्डाणपुलाची उभारणी केली
आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील सबवे चे काम केले
भक्ती शक्ती ते रावेत या ठिकाणी जोडणारा बीआरटी मार्ग
चिंचवड व निगडी येथे एसटी महामंडळाचा थांबा, प्रतीक्षालय व वाहतूक नियंत्रण कक्ष निर्माण केला
विविध ठिकाणी सुसज्ज स्थानिक बस स्थानक यांची उभारणी केली
पिंपरी ते शिवाजीनगर कोर्ट मेट्रो मार्ग तसेच पिंपरी ते निगडी भक्ती शक्ती पर्यंत नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली.
दुर्गादेवी टेकडी येथे निवासी आंतरराष्ट्रीय योगा वेलनेस सेंटर व निसर्गोपचार केंद्राची उभारणी केली
क्रीडा क्षेत्रातील कार्य
आमदार अण्णा बनसोडे यांनी पैलवान दत्तक योजनेअंतर्गत अनेक होतकरू पैलवानांना वैयक्तिक मदत केली. मतदार संघात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धा, धनुर्विद्या स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, बास्केटबॉल स्पर्धा, क्रिकेट इत्यादी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. मतदारसंघातील व्यायाम शाळा आवश्यक साहित्यासह अद्ययावत केल्या. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावा करिता अकॅडमी उभी करून देण्यासाठी सहकार्य केले.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
सिद्धार्थ पुस्तक पेढीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संचाचे वाटप. मतदारसंघातील शाळांमध्ये अद्यावत संगणक लॅबची उभारणी केली. सिटी प्राईड इंटरनॅशनल स्कूलमध्ये बास्केटबॉल ग्राउंड ची उभारणी केली. मतदार संघातील अनेक शाळांना डिजिटल करण्यात आले. सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत गरजूंना आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत मिळवून दिली. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. मतदार संघातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून दिले.
कामगारांसाठी केलेले कार्य
सिद्धार्थ मोफत विमा योजना राबविली. बांधकाम कामगार महामंडळाचा लाभ मिळवून देण्यासाठी संपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केला त्या माध्यमातून हजारो नोंदणीकृत बांधकाम मजुरांना योजनेचा लाभ मिळवून दिला. अण्णा बनसोडे युवा मंचच्या माध्यमातून हजारो टपरी धारक फेरीवाले व इतर लहान व्यवसायिकांना स्टॉलचे वाटप केले. एमआयडीसी मधील लघु उद्योजकांना सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी पुढाकार घेतला. एमआयडीसी मधील कायमस्वरूपी कामगारांना वेतन वाढ व कामगार कायदा नियमानुसार फायदे मिळवून देण्यासाठी सर्व कामगार संघटनांना मदत केली.
महिलांसाठी केलेली कामे
महिलांसाठी मोफत चार चाकी वाहन प्रशिक्षण व परवाना उपक्रम राबविला. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. बचत गटाच्या महिलांना महापालिकेमध्ये शालेय पोषण आहाराचे काम देण्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली. महिलांसाठी स्किल इंडिया योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर, कुकिंग, ज्वेलरी मेकिंग यासारखे अनेक प्रशिक्षणाचे आयोजन केले. महापालिकेमध्ये फायर सर्वेचे काम महिला बचत गटाकडून करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीनचे वाटप केले. महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण दिले. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रोत्साहन व मदत केली.
आरोग्य क्षेत्रातील कार्य
संपूर्ण मतदारसंघात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप. 5 हजार हृदयरोग रुग्णांसाठी मोफत अँजीओग्राफीची व्यवस्था. कर्करोग ग्रस्तांना सर्व प्रकारची मदत. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हजारो रुग्णांवर मोफत उपचार. मुख्यमंत्री सहायत्ता निधी मधून शेकडो नागरिकांना अनुदान मिळवून दिले. शिर्डी साईबाबा संस्थान यांच्या मार्फत अनेकांना वैद्यकीय आर्थिक अनुदान. मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन. रक्तदान शिबिराचे आयोजन करुन रक्तदानाबद्दल जनजागृती केली.
अध्यात्मिक व सामाजिक कामे
मतदारसंघातील सर्व धार्मिक स्थळांना सभामंडप उभारणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सीसीटीव्ही उभारणे यांसारख्या अनेक विकासकामांकरिता अर्थसहाय्य केले. सर्व धर्मातील धार्मिक कार्यासाठी आर्थिक मदत केली. मतदारसंघात पारायण, हनुमान जयंती, राम नवमी, यात्रा उत्सव अशा धार्मिक उत्सवासाठी आर्थिक मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, नवरात्री उत्सव साजरे करणाऱ्या जवळपास बाराशे मंडळांना दरवर्षी आर्थिक मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात पिंपरी येथे सर्वात मोठया अन्नदानाचे आयोजन केले. पालखी सोहळ्यातील जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या रथाच्या मखर, सिंहासन व पादुकांसाठी 15 किलो चांदीचे अर्पण. जेष्ठ नागरिकांसाठी धार्मिक यात्रेचे आयोजन करुन अनेकांना विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेण्याचा लाभ मिळवून दिला. वृद्धाश्रमासाठी वैयक्तिक अर्थसहाय्य केले.
सामाजिक बांधिलकी जोपासली
निराधार नगर झोपडपट्टी मधील जळीत कुटुंबांना आर्थिक मदत केली. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींना आर्थिक अनुदान मिळवून दिले. ज्येष्ठ नागरिकांना गृहुपयोगी वस्तूंचे वाटप. लग्न तुमचे आंदण आमचे योजनेअंतर्गत मतदार संघातील गरीब मुलींना लग्नात संसार उपयोगी वस्तूंचे आंदण दिले. करोना काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक व अनेक कुटुंबांना किराणा, रेशन व इतर आवश्यक साहित्याचे वाटप केले.
रोजगार निर्मितीसाठी काम
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व शासनाच्या इतर सर्व महामंडळामार्फत बीज भांडवल योजनेअंतर्गत नवीन उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. लाईट हाऊसच्या माध्यमातून मोफत स्वयंरोजगार कोर्स व उद्योग उभारणीसाठी तांत्रिक व आर्थिक मदत मिळवून दिली. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन साहाय्य केले. शिक्षित तरुणांना प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती इत्यादी संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन केले. शासनाच्या योजनेमार्फत तरुणासाठी मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवून देऊन अनेकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला.