चिंचवडच्या जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – भाऊसाहेब भोईर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 0८ नोव्हेंबर ।। चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज काळेवाडी – थेरगाव – रहाटणी या भागात वैयक्तिक गाठीभेटी करून प्रचार केला. यावेळी त्यांनी मा. नगरसेविका ज्योती भारती, विमल काळे, विजया सुतार, विनोद नढे, संतोष कोकणे, नेताजी नखाते, संजय नरळकर, शंकर नढे, बाळासाहेब नढे, सुरेश नढे, संभाजी नढे, उषा काळे, रवी नांगरे, दिनेश नडे, प्रवीण पाटील आधी मान्यवर व्यक्तींना ते भेटले. तसेच थेरगाव आणि रहाटणी परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या घरी त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला.

वैयक्तिक भेटी-गाठी आणि जनसंपर्कावर सध्या भाऊसाहेबांनी जोर देवून मतदार संघातील जनतेशी संवाद साधत आहेत. भोईर यांनी आज काळेवाडी थेरगाव रहाटणी भागात वैयक्तिक भेटीगाठीतून अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावत असणारे प्रश्न कसे सोडवता येथील याचा प्रयत्न करून नागरिकांना पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे अशी त्यांनी नागरिकांना ग्वाही दिली.

काळेवाडी रहाटणी आणि थेरगाव परिसरात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांचे राहणीमान उंचावले आहे. तशा नागरिकांना सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे.“चिंचवड येथील मतदार संघात मतदारांची संख्या वाढली. मात्र, समस्या जैसे थे’च आहेत. त्यामध्ये २४ तास पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू द्या, वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की घन कचरा व्यवस्थापन, याकडे आत्तापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठींब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय आहे. चिंचवडच्या जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *