राज्याचं तापमान ‘गरम’च; महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 0८ नोव्हेंबर ।। दरवर्षी दिवाळीत थंडी असते. पण आता देव दिवाळी, तुळशीचं लग्न आलं तरीही वातावरणात गारवा जाणवत नाही. त्यामुळे नागरिकांना अजून किती दिवस थंडीची वाट पाहावी लागेल असा प्रश्न उफा राहतो.

मुंबईकरांना थंडीची चाहूल 15 नोव्हेंबरनंतर लागेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कालावधीत किमान तापमानात घट होईल आणि महिनाअखेरीस गारवा जाणवेल असं IMD ने म्हटलं आहे. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमानाची नोंद 20 अंश सेल्सिअस एवढी नोंदवली आहे. नोव्हेंबरमधील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा नीच्चांक आहे. मात्र, 20 अंश किमान तापमान फार काळ टिकणार नाही. निवडणूक होईपर्यंत किमान तापमान चढेच असेल. किमान तापमान 22, तर कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास असेल. पहाटेचे वातावरण किंचित आल्हादायक असेल. मात्र, भरदुपारी उन्हाचे चटके कायम राहतील.

राज्यात कसं तापमान?
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात तापमान काही अंशी घसरल असल्याचं सांगण्यात येत आहे. वातावरणात सकाळी आणि सायंकाळी थंडी जाणवत आहे. गुरुवारी सांगली कमी तापमानाची नोंद म्हणजे 14.4अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अहिल्यानगरमध्ये 14.7 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यातील तापमानामध्ये गेल्या आठवडाभरापासून चढ-उतार पाहायला मिळत असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दिवाळीत थंडी नाही तर पाऊस बरसला
दिवाळीपूर्वी राज्यात थंडी पडली नाही; पण पावसाचे वातावरण होते. दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यामध्ये कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील किमान तापमानाची नोंद
सांगली 14.4
अहिल्यानगर 14.7
जळगाव 15.8
महाबळेश्वर 15.6
मालेगाव 17.8
सातारा 16.6
परभणी 18.3
नागपूर 18.6
पुणे 15.2

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *