महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ नोव्हेंबर ।। देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळीबाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कापरीसह अन्य पापलेट तसेच रावसच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, अन्य मासळीचे मागील आठवड्यात घटलेले दर स्थिर आहेत.
थंडीची चाहूल लागताच चिकन व अंडीला मागणी वाढू लागली आहे. परिणामी, चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये तर अंडीच्या भावात शेकड्यामागे पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी इतकाच पुरवठा होत असल्याने मटणाचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील मासळी
बाजारात रविवारी (दि. 10) खोल समुद्रातील मासळी 15 ते 20 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 600 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) – पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1400-1500, मध्यम : 1000-1200, लहान : 700-800, भिला : 500-600, हलवा : 500-600, सुरमई : 400-800, रावस : लहान 700-800, मोठा 800-900, घोळ : 700-800, करली : 300-320, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 300-360, पाला : 1400-1500. वाम : पिवळी 800-900, काळी : 400-500, ओले बोंबील : 140-200. कोळंबी : 200-360, मोठी : 400-600, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 600-700, लॉबस्टर : 2000, मोरी : 280-320, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-280, खेकडे : 360-400, चिंबोर्या : 500-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 240-280, नगली : 400-480, तांबोशी : 400-480, पालू : 200-240, लेपा : 160-200, बांगडा : लहान 140-180, मोठा 200-240, शेवटे : 200-240, पेडवी : 100-120, बेळुंजी : 160-200, तिसर्या : 200-240, खुबे : 160-180, तारली : 160-180. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : लहान 300-400 मोठी 480-600, शिवडा : 180-200, खवली : 200-240, आम्ळी : 140-160, खेकडे : लहान 250-300 मोठे 400-600, चिलापी : 60-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 780, बोलाईचे 780, खिमा 780, कलेजी 800. चिकन 230.लेगपीस 280, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 320. अंडी : गावरान (शेकडा) 980, डझन 36, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 615, डझन 84, प्रतिनग 7.