Aadhaar Card Update: आधार कार्डवरील नाव चुकलंय? किती वेळा करु शकता अपडेट; जाणून घ्या नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्रं आहे. प्रत्येक सरकारी कामासाठी किंवा महत्त्वाचे काही काम असेल तर आधार कार्ड हे लागतेच. आधार कार्डवर जर माहिती किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात.

आधार कार्डवर जर चुकीची माहिती असेल तर अनेक कामे होत नाही. त्यामुळे आधार कार्डवरील चुकीची माहिती बदलून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागते.आधार कार्ड आपण किती वेळा अपडेट करु शकतो, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

यूआयडीएआयकडून (UIDAI) आधार कार्ड जारी केले जाते. याचा उपयोग अगदी सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते सरकारी कामे करण्यापर्यंत होतो. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही पासपोर्टदेखील काढू शकता.

आधार कार्डवर (Aadhaar Card) तुम्ही जन्मतारीख, मोबाईल नंबर, पत्ता अपडेट करता येतो. तुम्ही माय आधार या वेबसाइटवरुन ऑनलाइन पद्धतीने अपडेट करु शकतात.सध्या तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय आधार कार्ड अपडेट करु शकतात.

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update)
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही मर्यादा आहेत. तुम्ही आधार कार्डवरील नाव फक्त दोनदा बदलू शकतात. यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकतात.

सरकारी नियमांनुसार १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केले पाहिजे. तुम्ही १४ डिसेंबर २०२४ पूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस ९० दिवसाची असते. आधार कार्ड अपडेटची विनंती ३० दिवसांच्या आता मंजूर केली जाते. त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आधार कार्ड अपडेट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *