Inflation: सामान्य नागरिका बेहाल : महागाईवर RBI चे नियंत्रण नाहीच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ नोव्हेंबर ।। खाद्यान्नाच्या किंमती भडकल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई (रिटेल चलनवाढ) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनवाढीच्या सहनशीलता मर्यादेपलिकडे जात ६.२१ टक्के नोंदवली गेली आहे. हा महागाई दर मागील १४ महिन्यांतील सर्वाधिक महागाई दर आहे.

सप्टेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई दर ५.४९ टक्के नोंदवला गेला होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा दर ४.८७ टक्के होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून किरकोळ महागाई दर हा रिझर्व्ह बँकेच्या चलनवाढ सहनशीलता कमाल ६ टक्के मर्यादेच्या पलिकडे नोंदवला जात आहे. ऑगस्ट २०२३मध्ये तो ६.८३ टक्के होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यान्नाच्या किंमती ऑक्टोबरमध्ये १०.८७ टक्के वाढल्या आहेत. सप्टेंबरमध्ये या किंमती ९.२४ टक्के, तर ऑक्टोबर २०२३मध्ये ही टक्केवारी ६.६१ होती. वार्षिक आधारावर ऑक्टोबरचा सीपीआय ६.२१ टक्के नोंदवला गेला आहे. याच महिन्यात ग्रामीण आणि शहरी चलनवाढ अनुक्रमे ६.६८ टक्के आणि ५.६२ टक्के नोंदवली गेली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, ऑक्टोबर महिन्यात डाळी आणि त्यांची उत्पादने, अंडी तसेच साखर व त्याची उत्पादने यांचा महागाई दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. या कार्यालयाने किरकोळ महागाई दरा मोजण्यासाठी १,११४ शहरी बाजारपेठांतून माहिती संकलित केली आहे. याशिवाय देशातील १,१८१ गावांतूनही किंमतींची माहिती घेण्यात आली आहे. ही सर्व माहिती प्रत्येक आठवड्याची घेण्यात येत असून त्याची सरासरी काढण्यात आली आहे.
Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॉप टीममध्ये VVIP एंट्री! मस्कसह भारतीय वंशाच्या रामास्वामींना मोठी जबाबदारी

किरकोळ चलनवाढ इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेल्यामुळे पतधोरणाच्या आगामी आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून दरकपात केली जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे अनेक बँका, उद्योगजगत आणि अर्थतज्ज्ञांचा विरस होण्याचीही शक्यता आहे. तसेच महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबावही वाढण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *