महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ नोव्हेंबर ।। सध्या राज्यात निवडणूकीची रणधूमाळी सुरू आहे. नेते आपआपल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू आसताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्योगपती गौतम अदानी पाच वर्षांपूर्वी भाजप आणि अविभाजित शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चर्चेचा भाग होते, असे अजित पवार म्हणाले. ते भाजपशी हातमिळवणी करण्यापूर्वी आणि 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून अल्पकालीन सरकार स्थापन करण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. या चर्चेत अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, फडणवीस आणि शरद पवार उपस्थीत असल्याचेही ते म्हणाले. एका वृत्त संस्थेला त्यांनी मुलाखत दिली आहे.
2014 मध्ये राष्ट्रवादीने भाजपला दिला होता बाहेरून पाठींबा
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वैचारिक विसंगती आणि ते असूनही ते भाजपसोबत गेल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. अजित पवार म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता, असेही अजित पवार म्हणाले. शिवाय राष्ट्रवादीने जाहीर केलेला पाठिंबा कायमस्वरूपी नसून केवळ सरकार स्थापनेसाठी आहे, असेही नंतर सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. या विषयावर पुढे विचारले असता, ते म्हणाले, आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी जे सांगतात तेच करतो.
सकाळच्या शपथविधीवरही केला गौप्यस्फोट
फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या सकाळच्या शपथ विधीबद्दलही अजित पवारांनी खुलासा केला. पाच वर्षे झाली, मीटिंग कुठे झाली हे सगळ्यांना माहीत आहे, ती दिल्लीत एका व्यावसायिकाच्या घरी होती, सर्वांना माहिती आहे. पाच बैठका झाल्या. अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार सगळे होते. सगळे ठरले होते. मात्र त्यानंतर जे घडले त्याचा दोष माझ्यावर टाकण्यात आला. मी दोष घेतला आणि इतरांना सुरक्षित केले असेही अजित पवार म्हणाले. शरद पवार नंतर भाजपसोबत का गेले नाही असे विचारले असता, पवार साहेबांचं मन कोणीही वाचू शकत नाही. आमच्या काकी (शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार) किंवा आमची बहिण सुप्रिया देखील नाही, असे अजित पवार म्हणाले.
