Retirement : कर्णधारपद सोडले आता तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, दिग्गज खेळाडूची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ नोव्हेंबर ।। क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. कसोटी मालिकेनंतर दिग्गज खेळाडू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. खेळाडूच्या निर्णयाने टीमला मोठा झटका बसला असून घरच्या मैदानावरच क्रिकेटला अलविदा करणार आहे. आता गेल्य काही दिवसांपूर्वी कर्णधाराचा राजीनामा दिल्यावर आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंड संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार टीम साऊदी आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने साऊदीच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे.

२०२४ मध्ये क्रिकेटमधील अनेक बड्या खेळाडूंनी निवृत्तीच घोषणा केली आहे या यादीमध्ये आता टीम साऊदीचेही नाव जोडले गेले आहे. टीम साऊदी इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २८ नोव्हेंबरला सुरू होणार असून दुसरा सामना ६ ते १० डिसेंबर आणि अंतिन सामना १४ ते १८ डिसेंबरला होणार आहे. टीम इंडियामध्ये झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही टीम साऊदी खेळत होता. या मालिकेमध्ये किवींनी ३-० ने टीम इंडियाला पराभूत केले होते. तर त्याआधी घरच्या मैदानावर श्रीलंकेने न्यूझीलंड संघाचा पराभव केलेला. त्यावेळी साऊदीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये २२ मार्च २००८ साली पदार्पण केले होते. आपल्या १४ वर्षांच्या करियरमध्ये त्याने १०४ कसोटी सामने खेळताना ३८५ विकेट घेतल्या आहेत. कसोटीमध्ये ३०० पेक्षा जास्त विकेट, वनडेमध्ये २०० पेक्षा जास्त आणि टी-२० क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील एकमेव गोलंदाज आहे. न्यूझीलंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये साऊदीने आपले स्थान निर्माण केले आहे.

दरम्यान, टीम साऊदीच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम साऊदीने टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि कॅप्टन रोहित शर्मापेक्षा जास्त सिक्सर्स लगावले आहेत. सेहवागने ९१ तर रोहितने ८८ आणि साऊदीने ९३ सिक्सर्स मारले असून खास विक्रमाची कायम चर्चा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *