होळीनिमित्त ‘या’ ठिकाणच्या बँका राहणार बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मार्च ।। Holi Bank Holiday : होळीचा (Holi) सण जवळ आला आहे. उद्या (25 मार्च) मोठ्या उत्साहात देशभर होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीर देशातील बाजारपेठा (Markets) सजल्या आहेत. दरम्यान, 25 मार्चला बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. होळी सणानिमित्त देशातील अनेक राज्यातील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं तुम्हाला जर बँकांचे व्यवहार करायचे असतील तर एकदा यादी तपासा आणि मगच घराच्या बाहेर पडा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही महिन्याच्या सुरुवातीलाच बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. ग्राहकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हा यामागचा हेतू असतो. होळी सणानिमित्त बँका बंद राहणार की नाहीत, याबाबत अनेक ग्राहक संभ्रमात आहोत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी आरबीयने दिलेली सुट्ट्यांची यादी तपासावी.

कोणत्या ठिकाणच्या बँका राहणार बंद
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यातील बँकांना उद्या सुट्टी राहणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे नवी दिल्ली, शिलॉंग, आंध्र प्रदेश, तेलंगणा. इटानगर, जम्मू काश्मीर, कोलकाता, लखनौ, रायपूर,अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, डेहराडून, आगरतळा, रांची या ठिकाणच्या बँका उद्या बंद राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी ही माहिती तपासूनच व्यवहार करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *