चिंचवड विधानसभेत शंकर जगतापांसाठी विविध संघटनांनी बांधली ‘वज्रमूठ’

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : चिंचवड : प्रतिनिधी, १७ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मतदारसंघातील सोसायटीधारक, आयटीअन्स, वकील, डॉक्टर, व्यापारी, कामगार, इंजिनिअर्स यांच्यासह विविध महिला बचत गट, तसेच राजकीय, सामाजिक संघटना आणि गावोगावच्या शेकडो सार्वजनिक तरुण मंडळांचा जाहीर पाठींबा त्यांना मिळताना दिसंत आहे.

चिंचवड विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सर्व विरोधकांना मागे पछाडत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. संपूर्ण मतदारसंघातून त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत असून मतदारसंघातील विविध सामाजिक, राजकीय संघटना आणि समाजघटकांनी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना पाठींबा जाहीर केला आहे.

यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र  मजूर पक्ष, अखिल सलमानी समाज विकास संस्था, उत्तर भारतीय सभा, पिंपरी चिंचवड आदिवासी कोळी समाज संघ, धनगर क्रांती सेना महासंघ, खान्देश युवा मंच, वाकड दिगंबर जैन ट्रस्ट, अखिल उत्तर भारतीय समाज, स्वराज्य सेना, कोळी महासंघ, संताजी सेवा प्रतिष्ठान, बौद्ध समाज बांधव, श्रीमंत समर्थ गर्जना वाद्यपथक, आरंभ वाद्यपथक, गजाक्ष वाद्यपथक, श्री वरदहस्त वाद्यपथक, धनेश्वर स्पोर्ट्स फाऊंडेशन, खान्देश तिळवण तेली समाज, जय मल्हार क्रांती संघटना, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, हिंदू टायगर फोर्स, रामोशी-बेडर-बेरड समाज, पोलीस मित्र संघटना, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, दापोडी – सांगवी भावसार समाज, सकल ब्राम्हण समाज, माथाडी व कामगार युनियन, आदिम कोळी समाज रॅपिड फोर्स या विविध संघटनांसह माळी आळी सार्वजनिक तरुण मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ, राणा प्रताप मित्र मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, उत्कृष्ट तरुण मंडळ, नवतरुण मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीकाळभैरवनाथ मित्र मंडळ, नव गजानन मित्र मंडळ, क्रांतिकारक भगतसिंग मित्र मंडळ, श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ यासह असंख्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत त्यांना जाहीर पाठींब्याचे पत्र दिले आहे.

त्याचबरोबर मतदारसंघातील शेकडो सोसायट्या, कामगार – उद्योजक आघाडी, विविध व्यापारी संघटना, डॉक्टर्स असोसिएशन, ऍडव्होकेट असोसिएशन, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, अभियंता असोसिएशन या घटकांनीही शंकर जगताप यांना पाठींबा जाहीर केला आहे.

दिवसेंदिवस पाठींबा देणाऱ्या समाजघटकांची संख्या वाढत असून शंकर जगताप यांना किमान एक लाखांहून अधिक मतांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प या सर्व संघटनांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *