Expensive Apps : हे आहेत असे अ‍ॅप्स ज्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला चुकवावे लागतील हजारो रूपये

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मार्च ।। सध्याचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत तर काही आणखी नव्या फिचर्ससहीत नव्याने दाखल होत आहेत. परंतु, तुमचा स्मार्टफोन किती ही महागडा असला तरी त्यात जर चांगले अ‍ॅप्स नसतील तर, त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

आपल्या सर्वांच्याच मोबाईलमध्ये चॅटिंगसाठी व्हॉट्सॲप असते. व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब असते आणि फोटो किंवा रील्स शेअर करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम असते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, प्ले स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत. ज्यांचा वापर करण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसे मोजावे लागतील. शिवाय, या अ‍ॅप्सचा वापर तुम्ही फ्रीमध्ये करू शकत नाही. कोणते आहेत हे अ‍ॅप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

मोस्ट एक्सपेंन्सिव्ह गेम सिरीज
जर तुम्ही गेमप्रेमी असाल किंवा तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर हे मोस्ट एक्सपेंन्सिव गेम सिरीजचे अ‍ॅप खास तुमच्यासाठी आहे. या अ‍ॅपमध्ये विविध प्रकारचे गेम्स आहेत. जे खेळण्यासाठी तुम्हाला या अ‍ॅपची मोठी किंमत मोजावी लागेल.

या गेम सिरीजमध्ये अनेक प्रकारच्या गेम्स उपलब्ध आहेत. परंतु, खेदाची गोष्ट ही आहे की यातले कोणतेही गेम्स तुम्हाला फ्रीमध्ये खेळता येणार नाही. हे इनस्टॉल करूनच खेळता येतील आणि त्यासाठी भरपूर पैसे तुम्हाला मोजावे लागतील.

डॉक्टर वेब सेक्युरिटी स्पेस लाईफ
डॉक्टर वेब सेक्युरिटी स्पेस लाईफ हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला चांगले पैसे मोजावे लागतील. हे एक खास सिक्युरीटीचे अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप तुम्ही विनामूल्य वापरू शकत नाही. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते.

विशेष म्हणजे हे ॲप डिव्हाईसची गोपनियता मजबूत करण्याचे काम करते आणि सुरक्षिततेसाठी देखील वापरले जाऊ शकते. मॅक आणि लॅपटॉपसाठी तुम्ही हे ॲप खरेदी करू शकता. जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप किंवा कोणतेही डिव्हाईस गोपनीय ठेवायचे असेल तर, तुम्ही या अ‍ॅपचा वापर नक्कीच करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *