![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ नोव्हेंबर ।। दिवाळीत उडवलेल्या फटाक्यांमुळे म्हणा किंवा कंपन्यांच्या धुरामुळे वातावरण अशुद्ध झाले आहे. सध्याची हवेची परिस्थिती बिकट आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात हे प्रमाण अधिक असलं तरी सांगली-कोल्हापूर पुण्यासारख्या शहरातही हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झालं आहे.
हवा दुषित झाल्याने लोकांना श्वसनाचे आजार तर होत आहेत. पण त्याचबरोबर डोळ्यात जळजळ, पाणी येण्याची समस्या घेऊन लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. ही समस्या लहान मुले,तरूण आणि मोठ्या अशा सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे. (Eye Care Tips)
प्रदूषणाचा डोळ्यांवरही गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते. ज्या लोकांना चष्मा आहे, डोळ्यांचे काही विकार आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
वायुप्रदूषणात अनेक प्रकारचे धोकादायक कण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड हे वायू आपल्या शरीरारासाठी धोकादायक आहेत. हवेत असलेले हे छोटे कण डोळ्यांत शिरतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होत आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे ऍलर्जी आणि जळजळ होऊ शकते. जास्त वेळ प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास त्याचा परिणाम डोळ्यांच्या नसांवरही होतो. काही रूग्णांमध्ये डोळ्यांच्या कॉर्नियाला देखील नुकसान होऊ शकते. ज्यामुळे अंधत्व येते.
प्रदूषणाचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो?
दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे डॉ. ए.के. ग्रोव्हर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हवेतील प्रदूषित कण डोळ्यांमध्ये गेल्यानंतर ते तिथे जमा होऊ लागतात. यामुळे हळूहळू डोळ्यांची जळजळ होऊ लागते. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा देखील येतो.
सतत प्रदुषित हवेत असल्याने डोळे मॅक्युलर डिजेनेरेशन होऊ शकते. ज्यामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. यावेळी डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, सूज किंवा डोळ्यांत पाणी येण्याची समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. या प्रकरणात, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे
डोळे स्वच्छ ठेवा : डोळे नियमित पाण्याने धुवा
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांमध्ये आय ड्रॉप्स टाका
डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रदूषक-विरोधी आय क्रीम वापरा
संध्याकाळी घरी आल्यानंतर डोळे धुवा.
गरम किंवा थंड पाणी लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
ही खबरदारी घ्या
धूळ आणि प्रदूषणात जाणे टाळा
धूळ आणि प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी गॉगल घाला
तुमच्या आहारात अ, क आणि ई जीवनसत्त्वांचा समावेश करा
नियमित डोळ्यांची तपासणी करा![]()
