महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। बॉर्डर-गावसकर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ आणि यजमान ऑस्ट्रेलियन संघ सध्या नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. मात्र या सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेट्समध्ये सराव करताना मिचेल स्टार्कचा फोटो समोर आला असून या फोटोंमधील एक गोष्ट पाहून भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. मिचेल स्टार्कची ही नवीन टेकनिक पाहून अनेक भारतीयांनी भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील 46 ऑलआऊटपेक्षाही वाईट अवस्था होते की काय अशी शंकाही उपस्थित केली आहे.
या गोष्टीमुळे भारतीय गोलंदाजांचंही टेन्शन वाढणार
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मिचेल स्टार्क अर्धवट लाल आणि अर्धवट पांढऱ्या चेंडूने सराव करताना दिसत आहे. हा खास प्रकारचा चेंडू केवळ हॅण्ड-आय कॉर्डिनेशन म्हणजेच हात आणि डोळ्यांचा समतोल सुधारण्यासाठी कामी येतो. तसेच या चेंडूमुळे फार शक्तीशाली आणि प्रभावी स्वींग मिळतो. पांढरा चेंडू स्वींग करण्याची क्षमता असलेला मिचेल स्टार्क हा फार दुर्मिळ गोलंदांपैकी एक आहे. केवळ पांढराच नाही तर लाल चेंडूवरही मिचेल स्टार्कचं उत्तम नियंत्रण आहे. मिचेल स्टार्कचं कौशल्य म्हणजे तो इन आणि आऊट स्वींग उत्तम प्रकारे करु शकतो. त्यामुळेच मिचेल स्टार्कच्या मदतीने सध्या नेट्समध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उत्तम सराव करता येत आहे. त्यातच आता अर्ध्या पांढऱ्या आणि अर्ध्या लाल चेंडूच्या मदतीने ऑस्ट्रेलियन फलंदाचा स्वींगवर फलंदाजी करण्याचा उत्तम सराव होत आहे. म्हणूनच या एका बॉलमुळे भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदांजाचंही टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.
Interesting. One half of the ball is white, the other half of the ball is red. Preparing the batters for lateral movement and reverse swing. Mitchell Starc.
Pic @debasissen/@RevSportzGlobal #AUSvIND #BGT pic.twitter.com/BjOYM8sDFp
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) November 18, 2024
भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
‘रेव्हस्पोर्ट्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ पर्थवरील सरावादम्यान स्वींग होणाऱ्या चेंडूंसमोर चाचपडताना दिसला. भारतीय फलंदाजांच्या याच कमतरतेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून केला जाण्याची शक्यता आहे. स्वींग गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार केली जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र अशी खेळपट्टी तयार करणं ऑस्ट्रेलियासाठीही घातक ठरु शकतं. कारण भारताकडेही उत्तम स्वींग गोलंदाज आहेत. म्हणूनच आता ऑस्ट्रेलियन फलंदाज मिचेल स्टार्कच्या मदतीने दोन रंगांच्या चेंडूने सराव करत असून या माध्यमातून भारतीय गोलंदाजांचा अधिक चांगल्याप्रकारे सामना करण्याची तयारी करत आहेत. मिचेल स्टार्क दोन रंगांच्या चेंडून सराव सत्रात गोलंदाजी करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मिचेल स्टार्कची कामगिरी कशी?
मिचेल स्टार्कने 2024 साली उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 10 डावांमध्ये 27 विकेट्स घेतल्या असून त्यांची सरासरी 32.25 इतकी असून स्ट्राइक रेट 49.60 इतका आहे. कर्णधार पॅट कमिन्स मिचेल स्टार्कचा उत्तम पद्धतीने वापर करुन घेईल यात शंका नाही. 2017 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर चषकामध्ये पराभूत केलं होतं.