‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’, राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर आडवाणींनी दिली प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. ०५ ऑगस्ट – :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लालकृष्ण आडवाणी एक संदेश जारी करत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे राम मंदिराची पायाभरणी करणे हा केवळ माझ्याच नाही तर सर्वच भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस आहे. राम मंदिर भारताचे सशक्त, संपन्न आणि स्नेहपुर्ण राज्य म्हणून प्रतिनिधित्व करेल. जेथे सर्वांना न्याय मिळेल व कोणीही वेगळे नसेल.

आडवाणी म्हणाले की, आयुष्यातील काही स्वप्ने पुर्ण होण्यासाठी खूप वेळ घेतात. मात्र जेव्हा ती पुर्ण होतात, त्यावेळी प्रतिक्षा सार्थकी लागली असे वाटते. असेच एक स्वप्न जे माझ्या ह्रदयाजवळ आहे, आज ते पुर्ण होत आहे. राम जन्मभूमिवर रामाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचे भाजपचे स्वप्न होते व मिशन देखील. नियतीने 1990 मध्ये रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान सोमनाथ ते अयोध्येपर्यंत राम रथयात्रा घडवली हे मी भाग्य समजतो. या यात्रेने असंख्य लोकांची आकांक्षा, उर्जा आणि इच्छा प्रेरित केली.

मला विश्वास आहे की राममंदिर भारताला शक्तिशाली, समृद्ध आणि शांततापूर्ण देश म्हणून प्रतिनिधित्व करेल. जेथे सर्वांना न्याय मिळेल व कोणलाही बहिष्कृत केले जाणार नाही. जेणेकरून आपण रामराज्याकडे अग्रेसर होऊ, जे सुशासनाचे प्रतिक आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *