महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत पहिल्या डावात पूर्णपणे गडगडलेला दिसला तर ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डीच्या जीवावर भारताने 150 धावा केल्या.
लक्ष्य प्राप्तीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला फार काही खेळता आले नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात खराब सुरुवात झाली होती, जसप्रीत बुमराहने 14 धावांच्या एकूण धावसंख्येवर पदार्पण करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीच्या (10) रुपात पहिला धक्का दिला होता. यानंतर बुमराहने एकाच षटकात उस्मान ख्वाजा (8) आणि स्टीव्ह स्मिथ (0) यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडला तर मोहम्मद सिराजने मिचेल मार्श (6) आणि मार्नस लॅबुशेन (2) यांना बाद केले.
What A Fightback by India led by Captain Bumrah!
Live #AUSvIND Score @ https://t.co/SyYxCsJCmW pic.twitter.com/TWKR99xHg7
— CRICKETNMORE (@cricketnmore) November 22, 2024
दिवसाची शेवटची विकेट बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या रूपाने घेतली.ऑस्ट्रेलियालाकडून ॲलेक्स कॅरीने 28 सर्वाधिक नाबाद धावा केल्या. ऑस्ट्रेलियालाकडून सर्वाधिक 4 विकेट जाॅस हेझलवूडने पटकावल्या. मिचेल मार्श, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 विकेट काढल्या. भारताकडून सर्वाधिक 4 विकेट या जसप्रीत बुमराहने काढल्या. मोहम्मद सिराजने 2 तर हर्षित राणाने 1 विकेट काढली.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत सर्वबाद झाला होता. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि एकूण 73 धावांपर्यंत 6 विकेट पडल्या. यानंतर ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांनी मिळून सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणारा रेड्डी सर्वाधिक धावा करणारा ठरला आणि त्याने 59 चेंडूंत 4 1 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय ऋषभ पंतने 78 चेंडूत 37 धावा आणि केएल राहुलने 74 चेंडूत 26 धावा केल्या. टीम इंडियाचे 7 खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.