महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ नोव्हेंबर ।। आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड हे १० वर्षांनी अपडेट करायचे असते. तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करु शकतात. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२४ आहे. तुम्ही मुदतीपूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त १९ दिवस उरले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करावे. दरम्यान, यापूर्वी आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ होती. ही तारीख वाढवून १४ डिसेंबर झाली आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाने सांगितले आहे की, आधार कार्डवरील कोणतीही माहिती तुम्ही अपडेट करु शकतात. १४ डिसेंबरपर्यंत तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो अपडेट करु शकतात. ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.
आधार कार्ड अपडेट
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जास्त काळ अपडेट केले नाही तर ते नक्कीच अपडेट करा. याचे अनेक फायदे तुम्हाला मिळणार आहे. तुमची सध्याची माहिती त्यात अपडेट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. त्याचसोबत आधार वेरिफिकेशनची माहितीदेखील तुम्ही अपडेट करु शकतात.
आधार कार्ड ऑनलाइन अपडेट
सर्वप्रथम तुम्ही UIDAIच्या myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन लॉर इन करावे.
यानंतर माय आधार हे सेक्शन चेक करा. त्यानंतर अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर अपडेट आधार डिटेल्सवर जा. यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा.
यानंतर क्रेडिंशियल टाका. त्यानंतर आधार कार्ड आणि कॅप्चा कोड टाकावा. यानंतर ओटीपीदेखील टाका.
तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीवरुन लॉर इन करु शकतात.
यानंतर अपडेट ऑप्शनवर जाऊन तुम्ही नाव, पत्ता या गोष्टी अपडेट करु शकतात.