महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडून आल्यावर २१०० रुपये देणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते. (Ladki Bahin Yojana News)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते देण्यात आले आहेत. आता पुढचा सहावा हप्ता कधी देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात महिलांच्या अकाउंटला जमा होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.(Ladki Bahin Yojana Next Installment)
राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटत नाही. महायुती सरकारमधून कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले नाही. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होईल, त्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळेल. परंतु यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नोव्हेंबर महिन्यात सत्ता स्थापन झाली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल. परंतु आता जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महिलांना सहाव्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते दिले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अॅडव्हान्समध्येच देण्यात आला होता. त्यामुळे आता फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे. तो हप्तादेखील पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो.