Social Media Ban: जगातील पहिलाच कायदा ; ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीगृहाने बुधवारी मंजूर केले आहे. या विधेयकावर अंतिम मोहोर उमटवण्याची जबाबदारी आता सिनेटवर आहे. या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यास अल्पवयीन मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा हा जगभरातील पहिलाच कायदा असेल.

विधेयकाची वैशिष्ट्ये
हे विधेयक १०२ विरुद्ध १३ मतांनी मंजूर
■ देशातील प्रमुख पक्षांचाही विधेयकाला पाठिंबा
■ प्रमुख पक्षांच्या पाठिंब्यामुळे हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होण्याची खात्री
सद्यस्थितीत कोणत्याही पक्षाला सिनेटमध्ये बहुमत नाही
सरकार किंवा विरोधी पक्षाशी संलग्न नसलेल्या खासदारांकडून चर्चेदरम्यान विधेयकावर सर्वाधिक टीका

कायद्यामुळे काय होणार ?
टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया मंचांवर लहान मुलांना खाती उघडण्यापासून रोखण्यात अपयश आल्यास या माध्यमांना पाच कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर (तीन कोटी ३० लाख अमेरिकी डॉलर) पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद.
विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास दंड लागू होण्यापूर्वी वयोमर्यादेच्या नियमाची अंमलबजावणीसाठी सोशल मीडिया मंचांकडे एक वर्षाचा कालावधी.

चिंताजनक! दररोज १४० महिलांचा कौटुंबिक छळाने मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे धक्कादायक निरीक्षण

परिणाम काय…
■ खासगीपणाच्या चालना देणाऱ्या संरक्षणास सुधारणा स्वीकारण्यास सरकारची सहमती
■ पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच अन्य ओळखपत्रे देण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना सक्ती करण्याची परवानगी नसणार
■ ही माध्यमेही सरकारी यंत्रणेद्वारे डिजिटल ओळखीची मागणी करू शकणार नाहीत

हा कायदा पूर्णपणे असेल का? नाही. परंतु कोणताही कायदा परिपूर्ण आहे का ? नाही. परंतु या कायद्याने जर काही मदत अगदी थोड्या प्रमाणात का होईना झाल्यास नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडेल. डॅन तेहान, – विरोधी पक्षाचे खासदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *