कडाक्याच्या थंडीत खूप वापरा गीजर आणि हिटर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। हिवाळ्यात हीटर आणि गिझर वापरणे सामान्य आहे. यामुळे विजेच्या बिलावर देखील तेवढाच भार पडतो. अशावेळी अनेकजण बिलाचा विचार करुन वीज वापरत अशतात. पण असं न करता तुम्ही गीझर आणि हिटरचा सर्वाधिक वापर करु शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

या टिप्स करा फॉलो
थर्मोस्टॅट वापरा – हीटरमध्ये थर्मोस्टॅट असल्यास, ते कमी तापमानावर सेट करा. यामुळे खोलीचे तापमान नियंत्रित राहून विजेची बचत होईल.
खोली पूर्णपणे बंद करा – हीटर चालवताना खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा जेणेकरून उष्णता खोलीच्या आत राहते.
हीटर जास्त चालवू नका – हीटर थोड्याच वेळात संपूर्ण खोली गरम करू शकतो. म्हणून, खोली गरम झाल्यावर, हीटर बंद करा. ते सतत चालवल्याने वीज बिल वाढते.
हीटर स्वच्छ करा – हीटरवर धूळ आणि घाण साचल्याने त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणून, आपले हीटर नियमितपणे स्वच्छ करत रहा.


गीझरकरिता खास टीप्स
गीझरचा आकार – तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आकारानुसार गिझर निवडा. खूप मोठा गिझर विनाकारण वीज वापरतो. त्यामुळे तुमचे कुटुंब लहान असल्यास मोठ्या आकाराचे गिझर खरेदी करू नका.
स्टार रेटिंग – गीझर खरेदी करताना स्टार रेटिंगकडे लक्ष द्या. जास्त स्टार रेटिंग असलेला गीझर कमी वीज वापरतो.
तापमान कमी ठेवा – गिझरचे तापमान जास्त ठेवू नका.
जास्त वेळ चालवू नका – गरम पाण्याची गरज पूर्ण झाल्यावर गिझर बंद करा. विनाकारण गिझर चालवू नका.
गीझरची सर्व्हिसिंग करा – गीझरची नियमित सर्व्हिसिंग करून घेतल्यास त्याची कार्यक्षमता चांगली राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *