Maharashtra CM: ……… तर रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री? दिल्लीत तावडे-शाहांमध्ये बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। महाराष्ट्रातील महायुतीमधील राजकीय नाट्य काही संपताना दिसत नाही. येत्या ५ डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यासाठी मुहूर्तही ठरला आहे. इतकंच काय तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.


दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडताना दिसत आहेत. दिल्लीत शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी नड्डा आणि भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात एक तास बैठक झाली. तसेच, विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा झाल्याचीही माहिती आहे. इतकंच नाही तर फडणवीसांचे निकटवर्तीय असेलेल आमदार रवींद्र चव्हाण यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप श्रेष्ठींच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नसल्याचं बोललं जात आहे.

भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने फडणवीसांनाच पसंती दिल्याचीही माहिती आहे. पण, विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीत बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जर, देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्यावर आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांनी संधी द्यावी असा डाव भाजपकडून खेळला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
अखेर मुहुर्त ठरला…चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार?

कारण, शनिवारी फडणवीसांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना तडकाफडकी दिल्लीत बोलावून घेतलं. त्यामुळे चव्हाण हे आपला पालघर दौरा अर्धवट सोडून दिल्लीला पोहोचले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर, फडणवीसांच्या नावावर आक्षेप असेल तर फडणवीस रवींद्र चव्हाण यांचं नाव समोर करु शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *