महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ डिसेंबर ।। महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे गटाला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनी दरे गावात मोठं विधान केलंय. उपमुख्यमंत्री बाबत चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये असल्याचं विधान शिंदेंनी केलंय.
महायुतीमध्ये मंत्रिपदावरून ओढाताण सुरुय. सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत बैठक होण्याआधी एकनाथ शिंदे दरे गावाला गेले होते. दरे गावाला गेल्यानंतर शिंदेंची तब्येत खराब झाली होती. आज ते ठाण्याकडे निघाले आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं. शिंदे गटाकडे उपमुख्यमंत्री पद जाणार आहे. या पदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे. यावरून पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न केला असून त्यावर शिंदेंनी उत्तर दिलंय.
मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. त्यात मोठं यश मिळालं. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सहकारी सोबत होते. त्यानंतर महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार ह्या फक्त चर्चा आहेत. या चर्चा फक्त माध्यम प्रतिनिधींमध्येच आहेत. उपमुख्यमंत्रिबाबत एक बैठक अमित शहा यांच्यासोबत झालीय, आता दुसरी मोठी बैठक परत होणार आहे. या बैठकीत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्या
निर्णयातून महाराष्ट्राचं भलं होईल असा निर्णय घेतला जाईल. या जनेतेने आम्हाला भरभरून मते दिली आहेत. चांगलं सरकार स्थापन व्हावे ही इच्छा जनतेची आहे,आणि ते इच्छा पूर्ण करायची आहे, असं शिंदे म्हणालेत.