ऑस्ट्रेलियन संघातील फुटीवर ट्रॅव्हिस हेडने तोडले मौन ; म्हणाला ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। पर्थ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव केला होता. कांगारू संघाने वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंसमोर गुडघे टेकले होते. ज्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कधीही हरला नव्हता, त्या मैदानावर 295 धावांच्या दणदणीत पराभवाने पॅट कमिन्सच्या संघासह माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठा धक्का दिला होता. हा पराभव कोणालाच सहन होत नव्हता. दरम्यान, पत्रकार परिषदेत जोश हेझलवूडने आपल्या वक्तव्याने नवा ‘बॉम्ब’ टाकला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने संघात फूट पडल्याचा दावा केला होता. आता ट्रॅव्हिस हेडने या दाव्यावर आपले मौन तोडले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ सध्या प्रचंड दडपणाखाली आहे. आता त्यांचे डोळे ॲडलेड येथे होणाऱ्या गुलाबी चेंडू कसोटी जिंकण्यावर आहेत. याआधी खेळाडूंमधील फुटीच्या बातम्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. द ऑस्ट्रेलियनला दिलेल्या मुलाखतीत त्याने ड्रेसिंग रूममध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा मतभेद असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. तो म्हणाला की, खेळाडूंमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सर्व खेळाडू एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. हेडच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियन संघाचा आठवडा खराब होता आणि आता ते 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाउन्स बॅक करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.

https://x.com/10NewsFirstMelb/status/1863481922451542027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1863481922451542027%7Ctwgr%5E2d06d92708b31a1abcf5bd8678478c735d521209%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Ftravis-head-reacts-to-dispute-within-australian-team-reveals-truth-about-dressing-room-ahead-adelaide-test-josh-hazlewood-2975940.html

हेडने ड्रेसिंग रूमबद्दल सत्य सांगितले आणि म्हटले की ‘इतर फलंदाज मला कोणत्याही प्रकारच्या फलंदाजीच्या टिप्स देण्यासाठी येत नाहीत. प्रत्येकाची खेळण्याची स्वतःची पद्धत आहे आणि आम्ही सर्वजण एकमेकांना सपोर्ट करत आहोत. पुढील तीन-चार दिवस परतण्याबाबत आमच्यात चर्चा होईल. गेल्या 3-4 वर्षांत आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आमच्यासाठी तो फक्त एक वाईट आठवडा होता, पण त्यात फारसा फरक पडला नाही. चांगल्या कामगिरीसाठी अजून 4 संधी शिल्लक आहेत. पूर्वीप्रमाणे, आम्ही पुन्हा एक नवीन मार्ग शोधू.

पर्थ कसोटीतील दारूण पराभवानंतर अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू संघावर नाराज होते. त्यांनी पॅट कमिन्स आणि त्याच्या संघावर जोरदार टीका केली. संघाचा दृष्टिकोन आणि खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. पराभवानंतर, पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोश हेझलवूडला लक्ष्याचा पाठलाग करू न शकल्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने जबाबदारी फलंदाजांवर टाकली. हा प्रश्न कोणत्याही फलंदाजाला विचारला पाहिजे, असे तो म्हणाला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *