Markadwadi Voting : मारकडवाडीत आज प्रत्यक्ष ‘बॅलेट पेपर’वर मतदान ; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ डिसेंबर ।। पूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील (Malshiras Assembly Constituency) मारकडवाडीत आज सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतदानाला (Markadwadi Ballot Paper Voting) सुरुवात झाली आहे. दरम्यान, मारकडवाडीत पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू असतानाही येथील ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदान प्रक्रिया सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये मतदारांनी ईव्हीएम मशीनवर (EVM) शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Janakar) व त्यांच्या समर्थकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येथे जवळपास 1905 मतदारांनी मागील निवडणुकीमध्ये मतदान केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांना 843 तर, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 1003 इतकी मतदान झाले होते. येथील बहुतांश मतदारांनी आपण उत्तम जानकर यांना मतदान केले असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी फिर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा देशात पहिलाच प्रयोग राबवला जात असल्याने येथील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर हे दोन दिवसांपासून या गावांमध्ये तळ ठोकून आहेत. या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *