CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। महायुती सरकारचा शपथविधी (CM Oath Ceremony) उद्या मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी लाडक्या बहिणींसाठीही विशेष आमंत्रण असणार आहे. त्यामुळे आझाद मैदानावर होणारी मोठी गर्दी पाहता मुंबई वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. यावेळी अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून ते शपथविधी कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.

कोणते मार्ग बंद?
महापालिका मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद
हजारीमल सोमानी मार्ग – चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित
प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद
आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *