![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। Gold Silver Price : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये लग्न समारंभाशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. लग्न म्हटले की सोने खरेदी आली. सोने खरेदीवर लोकांचा जोर वाढल्यामुळे सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज तर सोने चांदीचा दर वाढलेला दिसत आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.
सोने चांदीचा दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,३८२ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,७८० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९२,८३० रुपये प्रति किलो आहे.
५ डिसेंबरच्या आकडेवारीच्या तुलनेत आज सोने २६० रुपयांनी महागले आहेत तर चांदी ६०० रुपयांनी महागली आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,२५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)![]()
