Maharashtra vidhan sabha assembly session : आमदारांचा शपथविधी कधी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यानंतर आता विशेष अधिवेशनाचे वेध लागलेत. उद्या मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेय. त्यामध्ये आमदारांना गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनासंदर्भात माहिती दिली. राज्यपालांना तसं पत्र दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

आमदारांचा शपथविधी अन् राज्यपालांचे अभिभाषण
मुंबईमध्ये ७, ८ आणि ९ तारखेला आमदारांचे शपथविधी होण्याची शक्यता आहे. १६ तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार गेला जाणार आहे. त्याआधी अधिवेशनात आमदारांचे शपथविधी होणार आहेत. उद्या पासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सोमवारी ९ डिसेंबर रोजी राज्यपालांनी अभिभाषण करावे, मंत्रिमंडळाने याबाबात राज्यपाल यांना निवेदन पाठवले आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशानात ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा तडका –
नवं नियुक्त सरकारच्या मंत्र्यांचा स्वागतासाठी हिवाळी अधिवेशनात ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा तडका लागणार आहे. नऊवारी साडीतील तरुणी मंत्री आणि आमदारांचे स्वागत करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन एजन्सींना नियुक्त केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *