Horoscope Today दि. २४ फेब्रुवारी २०२६ ; आज कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. ……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २४ फेब्रुवारी २०२६ ||

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
पैशांची उधळपट्टी टाळावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधि सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *