हेडफोन अति वापर ? तुम्हाला कानाची समस्या निर्माण होऊ शकते. ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। आजकाल प्रवास करताना किंवा घरी निवांत असताना आपण हेडफोन किंवा इअरफोनचा वापर करतो. यावेळी काही लोकं इतक्या जोरात गाणी ऐकतात की,दुसऱ्या व्यक्तीने आवाज दिला तरी त्यांना समजत नाही.

मात्र इअरफोन आणि हेडफोनच्या माध्यमातून जोरात गाणी ऐकल्याने तुम्हाला कानाची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण होतात. ज्या तुमच्या जे कानांसाठी खूप धोकादायक ठरू शकतात.

ऐकण्याची क्षमता होऊ शकते कमकुवत
इअरफोन आणि हेडफोन्सचा जास्त काळ वापर केल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. यामुळे बहिरेपणाचा धोका खूप जास्त असतो. याचशिवाय अनेक तास इअरफोन आणि हेडफोन वापरल्याने कानात मळ साचू लागतो. त्यामुळे कानाचं इन्फेक्शन होऊन तुम्हाला ऐकण्याची समस्या जाणवू शकते.

हाइपरैक्यूसिसचा त्रास होण्याची शक्यता
यासंदर्भात मुंबईतील डॉ. योगेश दळवी म्हणाले की, आजकाल लोकं हेडफोन किंवा इअरफोन लावूनच गाणी ऐकतात. मात्र जास्त मोठ्या आवाजाने गाणी ऐकल्याने तुमच्या कानांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यातीलच एक समस्या म्हणजे हाइपरैक्यूसिस. हाइपरैक्यूसिस म्हणजे लहान आवाजातील गोष्टी सुद्धा तुम्हाला मोठ्या आवाजात ऐकायला येतात. यामध्ये ही समस्या असलेल्या व्यक्तीला समोरचा माणूस हळू आवाजात जरी बोलत असेल तरी मोठ्याने ऐकू येतं.

डॉ. दळवी यांनी पुढे सांगितलं की, हाइपरैक्यूसिस म्हणजे ऐकण्याची एक स्थिती आहे यामुळे ध्वनीची संवेदनशीलता वाढू लागते. यामुळे, रोजच्या आवाजांसारखे वाहत्या पाण्याचा आवाजही अत्यंत मोठा वाटण्याची शक्यता आहे. या समस्येमुळे रूग्णाला सामान्य वातावरणात दैनंदिन कामं करणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळलं पाहिजे.

जास्त जोरात हेडफोन किंवा इअरफोनमधील गाणी ऐकली टिनिटसची समस्याही जाणवू शकते. या समस्येमध्ये कानात वाजल्यासरखा सतत आवाज येऊ शकतो. मात्र या आवाजाचा बाह्य स्रोत नसतो म्हणजेच फक्त प्रभावित व्यक्तीलाचा तो आवाज ऐकू येतो. एका किंवा दोन्ही कानात वाजणं, गुणगुण असे सामान्यतः आवाज ऐकू येऊ शकतात. मुळात हेडफोन 60 टक्क्यांपेक्षा कमी आवाजात गाणी ऐकलं पाहिजेत, असंही डॉ. दळवी यांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *