टिकटॉकसारखे ‘इंस्टाग्राम’ चे ‘रील्स’ नावाचे नवीन फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ७ ऑगस्ट – फेसबुकने इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी टिकटॉकप्रमाणे ‘रील्स’ (Reels) नावाचं नवीन फीचर आणलं आहे. याद्वारे युजर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 15 सेकंदाचे छोटे व्हिडिओ शेअर करु शकतील.इंस्टाग्रामने भारतात नवीन शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स लाँच केलं आहे. कंपनी Reels फीचर गेल्या वर्षीपासून ब्राझिलमध्ये टेस्ट करत होती, त्यासोबतच फ्रान्स, जर्मनी आणि भारतातही गेल्या महिन्यात या फीचरची टेस्टिंग सुरू झाली होती. आता हे फीचर कंपनीने अधिकृतपणे लाँच केलं आहे.

Instagram च्या या नव्या सर्व्हिसमध्ये टिकटॉकप्रमाणे अनेक फीचर्स मिळतील. याद्वारे युजर्स अ‍ॅपवर व्हिडिओ बनवू शकतात, क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक अ‍ॅड करुन शेअर करु शकतात. यामध्ये टिकटॉकप्रमाणे लोकप्रिय गाणे, ट्रेंड किंवा चॅलेंजसह 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. यासाठी म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल करु शकतात किंवा व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करु शकतात. इंस्टाग्रामचं हे फीचर अ‍ॅपमध्येच आहे, त्यामुळे यासाठी नवीन अ‍ॅप डाउनलोड करावं लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *