गुगल मॅपमुळे रस्ता चुकला अन् घनदाट जंगलात अडकला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस खात्याने सुरू केलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या 112 हेल्पलाइनमुळे बिकट प्रसंगी अनेकांना तातडीने मदत उपलब्ध होत आहे. याचाच प्रत्यय आज पहाटेच्या सुमारास बिहारच्या एका कारचालकाला (Bihar Driver News) आला.

गुगल मॅपचा आधार घेत गोव्याला जाताना चुकीच्या दिशानिर्देशामुळे तो (Bihar Driver News) शिरोली जवळील घनदाट जंगलात पोचला. पोलिसांनी अवघ्या दीड तासात त्याच्या मदतीला धाव घेत त्याला सुरक्षितपणे महामार्गापर्यंत आणून सोडले.

राजदास रणजीत दास (रा. बिहार) आपल्या कारने (डब्लू बी 06 एच 8550) उज्जैनी येथून गोव्याच्या दिशेने जात होता. या मार्गाने तो पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने रस्ता चुकू नये, यासाठी त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. मोबाईलवर दिसणाऱ्या दिशा निर्देशाप्रमाणे तो कार चालवीत होता. पण रस्ता चुकून तो घनदाट जंगलात शिरोली जवळ जाऊन पोहोचला. रात्रीची वेळ असल्याने निर्जन स्थळामुळे त्याची पाचावर धारण बसली. रस्ता चुकल्याचे लक्षात येताच तो घाबरला. त्याने तातडीने 112 हेल्पलाइनवर फोन करून रस्ता चुकून आपण जंगलात अज्ञात स्थळी पोहोचल्याचे सांगितले. (Belgaum News)

तो थांबलेल्या जागी सुदैवाने मोबाईल रेंज उपलब्ध होती. त्याने पोलिसांनी दिलेल्या क्रमांकावर स्वतःची लाईव्ह लोकेशन सामायिक केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आय. बडीगेर पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी राजदास याला दिलासा देत बेळगाव – पणजी महामार्गापर्यंत सोबत करून रस्ता दाखवून दिला. गेल्या आठवड्यात गुगल मॅपमुळे उत्तर प्रदेश येथे पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. आजच्या प्रकाराने या घटनेची दिवसभर चर्चा ऐकायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *