निरोगी शरीरासाठी दिवसभरात किती पाणी प्यावे? वाचा सविस्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। मनुष्याचे शरीर हे पाण्याचे बनलेले आहे, असे म्हटले जाते. शरीरात 75 टक्के पाणीच असते. शरीर निरोगी राखण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे, यासाठी मार्गदर्शनही केले जाते. निरोगी शरीरासाठी दिवसभरात 8-9 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. ज्या व्यक्ती शरीराला पुरेसे किंवा 8-9 ग्लास पाणी पीत नाहीत, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराला पाण्याची कमतरता भासल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. पाणी कमी प्यायल्यास शरीर काही लक्षणांद्वारे आपल्याला संकेत देत असते. ते संकेत समजून योग्य प्रमाणात पाणी प्यावे.


मनुष्याचे शरीर पाण्याने व्यापले आहे, असे म्हणता येईल; कारण शरीरात 75 टक्के पाणीच असते. त्यामुळे दररोज 8-9 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात, तर काही गंभीर विकारही जडू शकतात. अर्थात, शरीराला पाणी कमी पडले तर शरीर काही लक्षणे दर्शवते. ती समजणे कठीण असते. त्यामुळे कित्येकदा व्यक्तींना शरीराला पाण्याची कमतरता भासत आहे, हे लक्षातच येत नाही; मात्र अशा वेळी दुसर्‍यांचा सल्ला महागात पडू शकतो.

शरीराला पाण्याची कमतरता भासते आहे हे कसे ओळखायचे, हा प्रश्न पडतो. शरीर याविषयी काही संकेत जरूर देत असते. ते समजून घेतले की, शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही. काही सर्वसाधारण गोष्टींतून हे संकेत मिळतात.

लघवीचा रंग : शरीरात पाण्याची कमतरता भासत असेल तर शरीर अनेक संकेत देते; पण ते ओळखणे आपल्याला कठीण जाते, कारण त्याविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. सर्वात पहिले लक्षण म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग पिवळा येत असेल तर शरीराला पाण्याची कमतरता भासत आहे. हे खूप सहज दिसून येणारे लक्षण आहे. लघवी करताना जळजळ होत असेल तरीही शरीरातील पाणी कमी झाल्याचे हे लक्षण आहे. ही समस्या भेडसावू नये यासाठी ठरावीक अंतराने पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. शरीर आरोग्यदायी राखण्यासाठी 2-3 लिटर पाणी प्यावे.

तोंडाला वास येणे ः शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तोंडाला दर्प येतो. आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यास तोंड कोरडे पडते. त्यामुळे तोंडाचा वास येऊ लागतो. शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर तोंडात तयार होणार्‍या लाळेचे प्रमाणही कमी होते. त्यामुळेही तोंडाचा घाण वास येतो. असा अनुभव आपल्यापैकी कोणाला येत असेल तर पाणी प्यायचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे तोंडाचा वास येण्याच्या समस्येपासून सुटका होईल.

डोकेदुखी : ज्या व्यक्तींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यांना वारंवार डोकेदुखी होत असल्याचा अनुभव येतो. डोकेदुखी कमी करण्यासाठी गोळ्यांचा वापर केला जातो. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. सतत औषधांचे सेवन केल्याने शरीराचे अंतर्गत नुकसान होते. त्यापासून बचाव करण्याचा एक उपाय म्हणजे दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विकार टाळता येतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *