Maharashtra Weather : थंडी कधीपासून परत येणार, हवामानाचा अंदाज काय सांगतो?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। राज्याभर सध्या ऐन हिवाळ्यातून थंडी गायब झाली आहे. ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम निघत आहे. तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी झोडपून काढत आहेत. मुंबईसह कोकणात उन्हाचा ताप अधिक वाढलाय. शुक्रवारी ठाणे येथे देशातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून थंडीला सुरुवात होणार आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहू शकते. सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीला सुरूवात होऊ शकते. सध्या काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर सोमवारपासून ढगाळ वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. मुंबई आणि कोकणकरांना थंडीसाठी प्रतिक्षा पाहावी लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पहाटे ५ वाजेचे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ अंशांपर्यंतही घसरण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दिवसभर जालना जिल्हयामध्ये सर्वदूर अवकाळी रिमझिम पाऊस बरसला . या पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जालन्यातील जाफराबाद तालुक्यात देखील काल आवकली पाऊस बरसला.यापावसामुळं शाळू ज्वारीचे पीक आडवे झाल्याने धान्य पिकाचे मोठे नुकसान झाले असून हरबऱ्याला देखील बुरशीजन्य रोगाचा धोका होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *