पदवीधारकांसाठी मंदीत ; बँकेत काम करण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ७ ऑगस्ट – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली आहे. देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती विविध बँकेत भरती निघाली आहे. मोठ्या पगारावर नोकरी मिळण्याची संधी पदवीधारकांना आहे. आयबीपीएस मार्फत १,१६७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी भरती आयोजित कऱण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करु शकतो. बँक ऑफ इंडिया (७३४ जागा), पंजाब आणि सिंध बँक (८३ जागा) आणि युको बँक (३५०) या बँकेत १,१६७ पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांपर्यंत असावे. एससी आणि एसटीसाठी यामध्ये पाच वर्षांची सूट तर ओबीसी अर्जधारकांसाठी तीन वर्षांची सूट आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी अर्जचे शुल्क १७५ रुपये तर इतरांसाठी अर्जाचे शुल्क ७५० रुपये आहे.

मानधन –

सुधारित आयबीपीएस पीओ वेतन १ जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे.
सुधारित वेतनश्रेणी 23,700 – (980 x 7) – 30,560 – (1145 x 2) – 32,850 – (1310 x 7) -42,020. बँक पीओचा सुधारित मूळ वेतन 23,700 रुपये आहे.

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 03, 10, 11 ऑक्टोबर 2020
मुख्य परीक्षा: 28 नोव्हेंबर 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *